इशा कोप्पीकर झळकणार या वेब सिरीजमध्ये
   दिनांक :01-Apr-2019
 
 
 

 
 
सध्या जमाना वेब सिरीजचा आहे. अभिनेत्री इशा कोप्पीकर लवकरच 'फिक्सर' नावाच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
इशा कोप्पीकरची ही पहिलीच वेबसीरीज असून, यातली तिची भूमिका आहे ती एका मराठी पोलीस अधिकाऱ्याची. जयंती जावडेकर असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. ही वेबसीरिज हिंदी असली, तरी त्यात मराठमोळं वातावरण पाहायला मिळेल. या नव्या माध्यमात काम करण्यासाठी स्वत: इशाही खूप उत्सुक आहे. सध्या इशा तिच्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून ती वेबसिरीजच्या तयारीला लागणार आहे.