निर्माते नव्या दयाबेनच्या शोधात !
   दिनांक :01-Apr-2019
 
'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेच्या निमित्ताने दिशा वकानी घराघरात पोहोचली ते म्हणजे तिने साकारलेल्या 'दयाबेन गडा' या भूमिकेमुळे. पण, गेल्या काही दिवसांपासून दिशा ही मालिकेपासून दूर असून आता मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्याऐवजी एका नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु केला असल्याचं म्हटलं जात आहे. जिच्यावर 'दयाबेन' या पात्राची धुरा सोपवण्यात येणार आहे. खुद्द असित कुमार मोदी यांनीच याविषयीची माहिती दिली.
 

 
 
 
गेल्या बऱ्याच दिवसांपासून दिशा आणि 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेच्या निर्मात्यांमध्ये असणारा हा तणाव मालिका विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आता या साऱ्यावर दिशा कोणता निर्णय घेणार किंवा काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, दिशाने मालिकेत न परतण्याचा निर्णय घेतल्याच तिच्याऐवजी दयाबेन हे पात्र त्याच ताकदीने निभावणारा चेहरा कोणाचा असेल, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तर दुसरीकडे असे झाल्यास अभिनेत्री सपना चौधरीला या भूमिकेसाठी निवडल्या जाऊ शकते अशी चर्चा इंडस्ट्रीमध्ये आहे.