Sacred Games 2 : काटेकर येणार परत ?
   दिनांक :01-Apr-2019
 
 
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 'सेक्रेड गेम्स' या वेबसाईजचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होत आहे. वेब सिरीज प्रदर्शित करण्याच्या अधिकृत घोषणेनंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  
 
 
 
दरम्यान नेटफ्लिक्सने सेक्रेड गेम्सचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये काटेकर, कुक्कू आणि बंटीची झलक पाहायला मिळते. हा टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कोणी बोलतं हे खरंय.. तर कोणी बोलतं ही मस्करी आहे. पण मंडाला कधीच कोणाला समजला नाही.’ टीझरमध्ये काटेकर, बंटी आणि कुक्कू स्वतःच्या डोक्यावर हाताने बंदुक धरताना दिसत आहेत. त्यामुळे सीक्वलमध्ये काटेकर आणि कुक्कू परत येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.