अपक्ष उमेदवार परशराम आडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
   दिनांक :10-Apr-2019
मानोरा, 
यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार परशराम भावसींग आडे यांचे विरोधात संताचे फोटो व नागरिकांना आवाहन केल्याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार परशराम भावसींग आडे यांनी एका वृत्तपत्रात २९ मार्च रोजी प्रचाराच्या शुभारंभाची जाहीरात प्रकाशीत केली. या जाहीरातीमध्ये नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यासोबतच संताचे फोटो छापले होते. त्यामुळे आचार संहितेचा भंग झाला. अशा कारणावरुन तहसील प्रशासनातर्फे फिर्यादी गजेंद्र बाबाराव अनपड यांच्या तक्रारीवरुन आरोपी पी. बी. आडे यांच्याविरुद्ध कलम १८८ भादंवी नुसार गुन्हा दखल केला. सदर प्रकरणाचा तपास मानोरा पोलिस करीत आहेत.