छापा टाकण्याआधी आम्हाला कळवत जा: निवडणूक आयोग
   दिनांक :10-Apr-2019
मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या छापेमारीमुळे सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र यावरुन निवडणूक आयोगाने संताप व्यक्त करत आयकर विभागाला चांगलंच खडसावलं आहे. निवडणूक आयोगाने आयकर विभागाला छापा टाकण्याआधी आम्हाला कळवत जा  म्हटले आहे .
 
 
निवडणूक आयोगाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीची निवडणूक आयोगाला कोणतीच माहिती नव्हती. फक्त केंद्रीय निवडणूक आयोगच नाही तर राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही याबद्दल कोणतीच सूचना देण्यात आली नव्हती.
निवडणूक आयोगाने आयकर विभागाची कानउघडणी करत सांगितलं आहे की, आचारसंहिता लागू असल्याने भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही छापेमारी किंवा कारवाई करताना निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना यासंबंधी माहिती देण्यात यावी. निवडणूक आयोगाने तंबी दिल्यानंतर आयकर विभागानेही आपल्याला याची कल्पना असल्याचं मान्य केले. यावर निवडणूक आयोगाने तुम्हाला कल्पना असूनही आम्हाला माहिती का देण्यात आली नाही अशी विचारणा केली.