मोदींच्या बायोपिकपाठोपाठ 'नमो टीव्ही'वरही बंदी
   दिनांक :10-Apr-2019
नवी दिल्ली,
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर कारवाई केली आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. त्यापाठोपाठ नमो टीव्हीवरही निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. नमो टीव्हीच्या प्रसारणावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात हे चॅनेल प्रसारित करता येणार नाही. पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकवर केंद्रीय निवडणूक आयोगाने काढलेला निर्णय हा नमो टीव्ही या चॅनेलसाठी लागू आहे असे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
- Ads-
तरुण भारतचे फेसबुक पेज लाईक करा
 
 
पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह निवडणूक आयोगाने एनटीआर लक्ष्मी आणि उद्यमा सिंह अशा बायोपिकवरही बंदी घातली आहे. तसेच मराठी सिनेमा धुमसलाही निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका बसला आहे. सांगली येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.
 
 
Web Title: elections commission banned Namo TV during election period