जीन एडिटिंग करून पहिल्या पालीचा जन्म
   दिनांक :10-Apr-2019
जॉर्जिया:
काही वर्षांपासून उंदीर, डुक्कर, बकरी, कोंबडी आणि फुलपाखरांच्या जीन्समध्ये बदल करण्याचा प्रयोग सुरू आहे. पण जीन एडिटिंगची महत्त्वपूर्ण पद्धत- सीआरआयएसपीआरने अशक्य वाटणारे एक जेनेटिक परिवर्तन केले आहे.
 
वैज्ञानिक आतापर्यंत सरपटणार्‍या प्राण्यांपासून दूर होते. परंतु, पहिल्यांदाच पारदर्शी दिसणारी एनोलिस लिजार्ड ही पाल जीनमध्ये बदल करून जन्माला आलेला पहिला प्राणी आहे.

 
 
या संशोधनाशी संबंधित जॉर्जिया युनिव्हर्सिटी, अमेरिकाची विद्यार्थिनी अॅशले रेसिस सांगते की, मी त्या पालीला अंड्यातून बाहेर येताना पाहून स्तब्ध झाले होते. आम्ही आधी अलबिनो लिझार्ड जन्माला घालण्याबाबत काहीच विचार केला नव्हता. सायन्स मॅगझिनमध्ये प्रकाशित संशोधनामध्ये पालीला जन्म दिल्याची सर्व माहिती दिली आहे. वैज्ञानिकांकडे आता जेनेटिक रिसर्चचा उपयोग करण्यासाठी एक नवीन मॉडेल आले आहे.
 
युनिव्हर्सिटीच्या जेनेटिक्स विभागाचे संचालक डगलस मेंके यांनी सांगितले की, मानवी जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी याप्रकारच्या मॉडेलचा उपयोग करू शकतो. त्यांनी सांगितले की, रेप्टाइल्सच्या सर्वच दहा हजार प्रजाती अशा रिसर्चपासून दूर होत्या. वैज्ञानिकांना वाटत होते की, असे करणे फार कठीण होईल. पण एका संशोधनामुळे हे शक्य झाले आहे.