भारतात ‘गुगल पे’ विनापरवाना सुरू
   दिनांक :10-Apr-2019
- दिल्ली हायकोर्टाची रिझर्व्ह बँकेकडे विचारणा
 

भारतात लोकप्रिय असलेले डिजिटल पेमेंट अॅप ‘गुगल पे’वरुन दिल्ली हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला खडसावले आहे. विनापरवानगी भारतात ‘गुगल प्ले’ कसं काय सुरु आहे? असा सवाल कोर्टाने विचारला आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली आहे, यावरुन कोर्टाने रिझर्व्ह बँकेला खडसावले.

 

 
 

कोर्टाचे मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्या. ए. जे. भंभानी यांच्या खंडपीठाने या जनहित याचिकेवर सुनावणी करताना रिझर्व्ह बँकेला सवाल केला आहे. याचिकेत म्हटले आहे की, ‘गुगल पे’ पेमेंट कायद्याचे उल्लंघन करीत असून भारतात या अॅपचा बेकायदा वापर केला जात आहे. ‘गुगल पे’ला बँकांकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचेही या याचिकेत म्हटले आहे.

कोर्टाने रिझर्व्ह बँक आणि गुगल इंडियाला यासंबंधी नोटीसही पाठवली असून अभिजीत मिश्रा यांच्याकडून यावर उत्तर मागवले आहे. २० मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सच्या यादीत ‘गुगल पे’चे नाव नाही. ही यादी समोर आल्यानंतरच हा वाद निर्माण झाला आहे.