सिद्धार्थ-सोनालीची वेब सिरीजमध्ये एन्ट्री
   दिनांक :10-Apr-2019
मुंबई,
वेबसीरिजच्या जगाची भुरळ आता मराठी कलाकारांनाही पडू लागली आहे. सई ताम्हणकर, अभिज्ञा भावे, भाऊ कदम याच्यानंतर आता यात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकरची भर पडली आहे. 'मनातल्या मनात' या वेबसीरीजमध्ये ते झळकणार आहेत.

 
 
'मनातल्या मनात' ही एक रोमँटिक कॉमेडी वेबसीरीज आहे. लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटणाऱ्या अभिषेक आणि शिवानीची ही गोष्ट आहे. सिद्धार्थ आणि सोनालीची ही पहिलीच बेवसीरिज असल्यानं दोघंही खूप उत्सुक आहेत. आता प्रेक्षक दोघांच्या जोडीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ८ एप्रिलपासून शेमारू अॅपवर ही वेबसीरिज सुरू झाली आहे.