कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
   दिनांक :10-Apr-2019
जालंदर:
 पंजाबचे मुख्यमंत्री  कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली आहे. जवानांच्या शौर्याचे राजकारण करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागत असल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे.हा आचारसंहितेचा भंग असून, याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
 

 
लातूरमधल्या औसा येथील प्रचारसभेत बोलताना मोदींनी नवमतदारांना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. तुमचे पहिले मत ज्यांनी पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता, त्या जवानांना जाईल का? पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना तुमचे पहिले मत जाईल का? असे नवमतदारांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले होते. त्यामुळेच चिडलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे सूत्रांनी वृत्तसंस्थेस सांगितले.