पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र
   दिनांक :10-Apr-2019
मुंबईः
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ११ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र दिलं आहे.
 
 
लोकसभा निवडणुकीच्या काळात चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्पुरती स्थगिती आणण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत चित्रपट निवडणुकीच्या काळात प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा असं स्पष्ट केलं होतं. कोर्टाच्या निर्णयानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयनं 'तुमच्या सगळ्यांच्या आर्शीवाद आणि पाठिंब्यामुळं आज आम्ही कोर्टात जिंकू शकलो. भारताच्या न्यायव्यवस्थेचे आभार' असं ट्वीट केले आहे.