प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता
   दिनांक :10-Apr-2019

‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेता प्रभास केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाही तर जगभरात प्रसिद्ध झाला. प्रभासचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. या चाहत्यांसाठी प्रभासकडून एक खुशखबर आहे. तो लवकरच इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर पदार्पण करणार आहे. प्रभास आतापर्यंत फक्त फेसबुकवर सक्रीय होता. पण आता तो इन्स्टाग्रामद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहे.

 
 
 

आपल्या आवडच्या सेलिब्रिटीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियामुळे चाहते आणि सेलिब्रिटींमधील दरी कमी होते. हेच जाणून घेत प्रभासने इन्स्टाग्रामवर येण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभासचा आगामी ‘साहो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली आहे. ही टीम प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षित करणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. ‘साहो’मध्ये प्रभास आणि श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे.