आजचे राशी भविष्य, दि. १० एप्रिल २०१९
   दिनांक :10-Apr-2019
 

मेष- आजचा दिवस चांगला असेल. मित्रांची मदत मिळेल. जुन्या मित्रांनाही भेटाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहेत. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. तुमच्या विचारांना दुजोरा दिला जाईल. व्यवसायात वाढ होईल. अचानक फायदा होईल.

वृषभ- नशिबाची साथ आहे. अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. बऱ्याच काळापासून एखादं काम करण्याच्या विचारात असाल, तर तेसुद्धा पूर्ण होईल. नको असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहाल. अचानक अर्थार्जनात वाढ होईल. काही गोष्टींचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न कराल. पण, त्यात अपयशी ठराल. साधीदाराचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मिथुन- मित्रांच्या जोडीने काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न कराल. पण, यासाठी प्रयत्न तुम्हालाच करावा लागणार आहे. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. अविवाहितांसाठी विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता. कुटुंबासोबत काही मतभेद असतील तर, ते दूर होतील. तुमची काम करण्याची पद्धत इतरांना प्रभावित करेल. मित्र आणि भावंडांची मदत होईल.

कर्क-  प्रयत्नांना यश मिळेल. पैसे खर्च झाले तरीही याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. जवळच्या मंडळींसाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. पण, त्यासाठी मनात कोणतीही शंका ठेवू नका. सकारात्मक दृष्टीकोनाचा फायदा होईल. मुलाबाळांवर लक्ष ठेवा.

सिंह- तुम्हाला नव्या संधी मिळतील. दैनंदिन कामं पूर्ण होण्यास काही अडचणी येणार नाहीत. करिअरच्या दृष्टीने ज्या व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांच्यावर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. परिणामी अर्थार्जनात वाढ होण्याचीही चिन्हं आहेत. आज केलेल्या कामांनी पदोन्नती होण्याची चिन्हं आहेत. काही नवी कामं करण्याचा बेत आखू शकता. कुटुंबात तुमची चांगली प्रतिमा तयार होईल.

कन्या- अडचणीत असणाऱ्यांना काही अंशी उसंत मिळेल. बचत करण्यात यशस्वी व्हाल. प्रयत्नांच्या बळावर योग्य वेळी तुम्ही उपस्थित असाल. ज्यामुळे तुमची अडकलेली कामंही पूर्ण होतील. कुटुंबात काही अडचणीचे प्रसंग आले तरीही दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी असेल. तुमचा सल्ला इतरांसाठी फायद्याचा ठरेल.

तुळ- अचानक धनलाभ होण्याची चिन्हं. तुमच्या योजना यशस्वी होण्याची चिन्हं. विचार आणि चर्चेच्या बळावर तुमचं मत मांडण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठराल. जवळच्या व्यक्तींसोबतची नाती सुधारतील. करियरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. मित्रमंडळींसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. तुमच्यासाठी दिवस चांगला असेल.

वृश्चिक- धैर्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर महत्त्वाच्या कामांची सुरुवात करा. यश मिळेल. काही गोष्टींचा त्यागही करावा लागेल. गुप्त माहिती मिळेल. काही कामं मार्गी लावण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.

धनू- काही गोष्टींमध्ये फायदा होणार आहे. पैशांशी निगडीत कामं पूर्ण कराल. अवाजवी खर्चांपासून दूर राहाल. दिनचर्येत सुधारणा होईल. काही विचार मनात घर करतील, नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल. प्रवासयोग संभाव्य आहे. धनलाभ होईल. अडचणी दूर होतील.

मकर- कुटुंबाला जास्त वेळ द्यावा लागेल. गरज पडल्यास कुटुंबासाठी काही गोष्टींचा त्यागही करावा लागेल. प्रेमसंबंधांसाठी चांगला काळ आहे. दिवस चांगला असेल. विचारात असणारी कामं मार्गी लागतील. काही असे प्रसंग समोर येतील ज्यामुळे भविष्यात फायदा होण्याची चिन्हं मिळतील. दिवस आणि मानसिक स्थिती उत्साही असेल.

कुंभ- जुन्या अडचणी दूर होतील. कुटुंब आणि मुलाबाळांच्या बाबतीत काही महत्त्वाचे बदल होतील. जवळच्या व्यक्तींशी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. गुंतवणूकीचे बेत आखाल. गप्पा- चर्चांच्या ओघात कोणा एका व्यक्तीशी असणारे तुमचे संबंध आणखी दृढ होतील. आजच्या दिवशी तितकेच पैसे गुंतवा जितके गुंतवू शकाल. ग्रह- नक्षत्र त्यांचे परिणाम दाखवण्यास सुरुवात करत आहेत.

मीन- कोणताही बेत न आखता एखादं मोठं काम पूर्णत्वास न्याल. नात्यांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हं आहेत. रुसवा असणाऱ्यांची मनधरणी कराल. काही नव्या संधी शोधण्याचे प्रयत्न कराल. महत्त्वाच्या लोकांशी मैत्री होईल. कुटुंबाची मदत मिळेल.