विकिलीक्सचा संस्थापकाला अटक
   दिनांक :11-Apr-2019
लंडन,
अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजे याला ब्रिटन पोलिसांनी अटक केली. एक्वाडोर येथील दूतावासातून त्याला ताब्यात घेतलं आहे. ब्रिटन पोलिसांनी बुधवारी त्याच्या अटकेची माहिती दिली.