अश्विन शर्माला वनविभागाची नोटिस
   दिनांक :11-Apr-2019
भोपाळ:
मध्यप्रदेशात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीदरम्यान मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कड यांचा निकटवर्तीय अश्विन शर्माच्या घरातून वन्यप्राण्यांची कातडी आणि त्यांचे अवशेष आढळले होते. त्याला या प्रकरणी मध्यप्रदेश वनविभागाने नोटिस बजावली आहे. बेकायदेशीर शस्त्र आणि मद्य बाळगल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 
 
निवडणूक आयोगाला माहिती दिल्यावर शर्माला आम्ही नोटिस पाठवली आहे, अशी वनाधिकारी एच. एस. मिश्रा यांनी सांगितले. शर्माने वन्यप्राण्यांच्या कातडी आणि अवशेषाबाबतचे कागदपत्र अद्याप वनविभागाला दिले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्याच्या विरोधात पोलिसांनी अबकारी आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती दक्षिण भोपाळचे पोलिस अधीक्षक संपत उपाध्याय यांनी दिली.