न्यू इंग्लिश शाळेच्या केंद्रावर खोडसाळपणा
   दिनांक :11-Apr-2019
- डमी मतपत्रिकेवर रिजेक्टेडचा ठप्पा
नागपूर,
मतदान प्रक्रियेचा प्रारंभ नागपूर शहरात शांततेत झाला; पण काही खोडसाळ व्यक्तींनी न्यु इंग्लिश हायस्कूल कॉंग्रेसनगरच्या मतदान केंद्राबाहेर अधिक़ार्‍यांनी चिकटवलेल्या डमी मतपत्रिकेवर महायुतीचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावापुढे दोन ठिकाणी, ‘रिजेक्टेड’, असा ठप्पा मारलेला दिसून आला. त्यामुळे मतदानाच्या प्रारंभी आलेल्या मतदारांना ही बाब लक्षात आल्याने ती उघडकीस आली.

संबंधित मतदारसंघात किती उमेदवार रिंगणात आहेत व त्यांचा क्रम तसेच त्यांचे चिन्ह, नाव असलेली डबी मतपत्रिकार मतदारांच्या माहितीसाठी पोिंलग बुथबाहेर लावण्याचा नियम आहे. प्रत्येक निवडणुकीत हा नियम कटाक्षाने पाळला जातो. तो आजही पाळला गेला; पण डमी मतपत्रिकेवरील गडकरींचा फोटो आणि नावापुढे रिजेक्टेड, असा ठप्पा मारलेला दिसला. हा प्रकार कुणी केला यासंदर्भात अजून काहीही निष्पन्न झालेले नाही. हा प्रकार ध्यानात आल्यानंतर काही जागृत मतदारांनी ही बाब भाजपाचे नगर महामंत्री संदीप जोशी यांच्या ध्यानात आणून दिली. त्यानंतर त्यांनी या केंद्राला भेट दिली व केंद्र अधिकार्‍यांकडे यासंदर्भात तक्रारदेखील केली.