सुव्रत आणि सखी अडकले विवाहबंधनात
   दिनांक :11-Apr-2019
मुंबईः
 अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या साखरपुड्यानंतर आता वेध लागले आहेत ते 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांच्या लग्नाचे. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांच्या लग्नाची धामधूम सुरू झाली असून ११ एप्रिलला सखी आणि सुव्रत लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या मेंहदीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ते येत्या दोन दिवसांतच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर सखीनंच 'मी ११ एप्रिलला सुव्रतसोबत लग्न करणार असल्याचं 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं.
 
 
काही दिवसांपूर्वी सखीनं बॅचलर स्पिनटर्स पार्टीचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता सुव्रतनं इन्स्टाग्राम स्टोरीला मेंदहीचे फोटो शेअर केले आहेत. तसंच त्यांच्या अनेक मित्र मंडळीनं मेंहदी समारंभातील फोटो शेअर करत सखीला नवरी तर सुव्रतला नवरा असं म्हटलं आहे. तर, अभिनेत्री पर्ण पेठे वर पक्षाकडून असून ती सुद्धा लग्नासाठी रवाना झाली आहे. त्यामुळं या फोटोंवरून दोघंही येत्या काही दिवसांतच लग्न करणार असल्याचा अंदाज बांधला जात होता आणि अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. मालिकेच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झालं असं बोललं जातं. त्यानंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातही त्यांनी एकत्र काम केलं होतं.