पती आंघोळ करीत नाही म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट
   दिनांक :11-Apr-2019
 भोपाळ : बऱ्याचदा संसारात वादाची ठिणगी पडल्या नंतर तो वाद घटस्पोटाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतो. घटस्फोट घेण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी करणे असतात. काही शुल्लक तर काही आक्षेपाहार्य, पण भोपाळमध्ये एका महिलेने चक्क नवरा आंघोळ करत नाही म्हणून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. नवरा दाढी करीत नाही, अंघोळ करीत नाही, घरात स्वच्छता पाळत नाही म्हणून तिने नवऱ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

 
 
 
भोपाळमध्ये राहत असलेल्या सिंधी समाजाच्या मुलाने ब्राह्मण समाजातील मुलीसोबत २०१६ साली विवाह केला. वर्षभरापर्यंत या दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. परंतु, पतीने दाढी वाढवली आणि या दोघांच्या नात्यात कटूता यायला सुरुवात झाली. पती दाढी करीत नाही. थंडीचं कारण पुढं करून तो अंघोळ करीत नाही. परफ्यूम लावून अंगाचा वास झाकण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप करीत महिलेनं कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तर, अधिकारी घटस्फोट होऊ नये यासाठी त्यांचे काउसलिंग करीत आहेत.