एमआयएमची महाराष्ट्र, तेलंगणा, बिहारकडे धाव
   दिनांक :12-Apr-2019
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात तेलंगणासह देशात २० राज्यांमधील ९१ लोकसभा मतदारसंघात मतदान गुरुवारी संपले.
 
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा हैदराबादमधून मैदानात आहेत. या जागेवरून त्यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये निवडणूक जिंकली आहे.

 
 
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, यावेळी एमआयएम तेलंगणासह बाहेर देखील आपला डंका वाजवणार आहे. आमचा पक्ष बिहार आणि महाराष्ट्रात यावेळी खातं उघडेल, असा विश्वास ओवैसी यांनी व्यक्त केला.
 
- Ads-
तरुण भारतचे फेसबुक पेज लाईक करा
 
 
यावेळच्या निवडणुकीत पुन्हा एकदा अली आणि बजरंगबलीची चर्चा सुरू झाली आहे. यावर ओवैसी म्हणाले की, आम्ही अलीलाही मानतो आणि बजरंगबलीलाही मानतो. मोदी सरकारकडे काहीच सांगण्यासारखे नसल्याने धर्माच्या नावावर मतं मागितली जात आहेत असे त्यांनी सांगितले.