क्वेटा शहरात स्फोट, 21 मृत्युमुखी
   दिनांक :12-Apr-2019
इस्लामाबाद,
पाकिस्तानच्या क्वेटा शहरातील भाजी मंडीत शुक्रवार 12 एप्रिल रोजी झालेल्या स्फोटात 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिया हजारा या मुसलमानांमधील अल्पसंख्यक समुदायातीलच सर्व मृत असल्याचे सांगण्यात येते.
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, क्वेटा येथील हजारगंजमधील भाजी मंडी परिसरात शुक्रवारी स्फोट झाला. या स्फोटात 21 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 50 जण जखमी आहेत. जखमींची प्रकृती िंचताजनक आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अल्पसंख्यकांची काळजी कशी घ्यावी, याचा सल्ला मागे पंतप्रधान इम्रान खानने भारताला दिला होता. परंतु, त्यांच्याच देशात अल्पसंख्यकांची काय गती आहे, हे यानिमित्त जगासमोर आले आहे.