रेल्वे प्रवाशांसाठी 49 पैशात दहा लाख रुपयांचा विमा
   दिनांक :12-Apr-2019
नवी दिल्ली,
रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) अवघ्या 49 पैशात दहा लाखांचा विमा दिला जाणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून रेल्वेचे तिकीट खरेदी केल्यास प्रवाशांना या विम्याचा लाभ मिळू शकतो.
 

 
 
आयआरसीटीसीची ही सेवा आधी प्रवाशांना मोफत दिली जात होती. परंतु, आता या सेवेसाठी 49 पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. जर प्रवाशांनी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून रेल्वे तिकीट बुक केले तर तिकिटाव्यतिरिक्त ग्राहकांना 49 पैसे जास्तीचे मोजावे लागतील. जर रेल्वे प्रवाशांना विमा हवा असल्यास ऑनलाईन तिकीट बुिंकग करताना हा पर्याय दिसेल. यासाठी ग्राहकाला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा लागेल. तसेच अधिकृत माहिती भरल्यानंतर यासंबंधी माहिती एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना मिळेल.
प्रवाशांचे तिकीट आरएसी िंकवा कन्फर्म असेल तरच या विम्याचा लाभ प्रवाशांना मिळेल. रेल्वे दुर्घटनेत प्रवाशाचा मृत्यू झाल्यास िंकवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्या प्रवाशाला दहा लाखांचा विमा मिळेल. अर्ध अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये मिळतील. हॉस्पिटलमधील उपचारासाठी अतिरिक्त दोन लाख रुपयांचा विमा मिळेल.