पंतप्रधान मोदींना आणखी एक सन्मान
   दिनांक :12-Apr-2019

 
 
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. रशियातील सर्वोच्च ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोसल पदकानं मोदींचा गौरव करण्यात येईल. रशिया आणि भारत यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेल्याबद्दल मोदींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रशियन दूतावासाने ट्विट करुन ही माहिती दिली.