बघा: स्टुडंट ऑफ द इअर-२ चा जबरदस्त ट्रेलर
   दिनांक :12-Apr-2019
करण जोहरचा २०१२मध्ये आलेला 'स्टुडंट ऑफ द इअर' चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर करणनं 'स्टुडंट ऑफ द इअर २'ची घोषणा केली. आज या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरवरूनच ड्रामा, रोमान्स, ॲक्शन या चित्रपटात बघायला मिळणार यात काही शंका नाही.

 
कॉलेजलाइफ, कॉलेजातील लव्हस्टोरी, स्पर्धा जिंकण्यासाठीची चुरस यासगळ्याची झलक या ट्रेलरमधून दिसतेय. चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच इथं ही 'स्टुडंट ऑफ द इअर' ट्रॉफी मिळवण्यासाठीची चढाओढ इथं पाहायला मिळतेय. आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात हे नवे स्टुडंट कितपत यशस्वी होतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
 
 
 
या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. स्टुडन्ट ऑफ द इयर-२ येत्या १० मे रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.