अकोल्यात १११ गुन्हेगार तडीपार
   दिनांक :13-Apr-2019
 

 
 
अकोला : श्रीराम नवमी उत्सव आणि आंबेडकर जयंती निमित्य शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १११ सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (२) नुसार अधिकाराचा वापर करत उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत असलेल्या १११ गुन्हेगारांना तडीपार करण्याचा १२ एप्रिलला आदेश दिला आहे. त्यानुसार अकोट फैल पोलीस स्टेशन अंतर्गत १३, जुने शहर पोलीस स्टेशन २९, एमआयडीसी पोलीस स्टेशन १५, डाबकी रोड पोलीस स्टेशन १६, खदान पोलीस स्टेशन ०८, रामदास पेठ पोलीस स्टेशन १३, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन १७ असे एकूण १११ गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला आहे.