आध्यात्मिक जागृतीसाठी...
   दिनांक :13-Apr-2019
आपल्या प्रत्येकात एक शक्ती दडली आहे. प्रत्येकाने आध्यात्मिकदृष्ट्‌या जागृत होणं खूप गरजेचं आहे. आध्यात्मिक जागृतीच्या काही खुणा आहेत. या खुणा दिसत असतील तर आपली वाटचाल आध्यात्मिक जागृतीच्या दिशेने होतेय हे नक्की! या खुणांविषयी...
 
 • आध्यात्मिक जागृती झाल्यानंतर आपल्या शरीरातले विविध अवयव दुखू लागतात. मान, खांदे आणि पाठीच्या वेदना वाढतात. तुमच्या डीएनएमध्ये बदल घडत असल्याने या वेदना जाणवू लागतात.
 • कोणत्याही कारणाशिवाय आतून दु:खी असल्यासारखं वाटत राहतं. आपण आपला भूतकाळ बाहेर टाकत असल्याने दु:खाची भावना निर्माण होते.
 • कोणत्याही कारणाशिवाय रडणं ही सुद्धा आध्यात्मिक उन्नतीची, जागृतीची खूण आहे. अश्रूंच्या रूपात आपली दु:खं वाहून जातात. ही खूण आरोग्यदायी आणि सकारात्मक मानली जाते. यामुळे शरीरातली नकारात्मक ऊर्जा दूर सारली जाते.
 • नोकरी किंवा व्यवसायात अचानक झालेला बदल ही सुद्धा आध्यात्मिक जागृतीची खूण मानली जाते. तुमच्यात बदल झाला की आसपासची परिस्थितीही बदलते.
 • कौटुंबिक नात्यांमधून आलेली विरक्ती ही अध्यात्मिक उन्नतीची खूण आहे. आधीच्या जन्मातील कर्मांमुळे तुम्हाला एक कुटुंब मिळतं. या कर्माच्या चक्रातून मुक्ती मिळाली की नात्यांचे बंध सुटू लागतात. कुटुंब आणि मित्रांपासून तुम्ही दूर जाऊ लागता.
 • झोपेचं चक्र बिघडणं ही आणखी एक खूण मानली जाऊ शकते. रात्री २ ते ४ या वेळेत तुम्ही उठता. तुमच्या मनात अनेक गोष्टी सुरू असतात.
 • युद्ध, मारामारीची स्वप्नं, कुणी तरी पाठलाग करतंय असं स्वप्न पडणं ही सुद्धा आध्यात्मिक उन्नतीची लक्षणं आहेत.
 • पावलं जमिनीवर ठेवता येत नाहीत किंवा आपण दोन जगांच्या मधून चालतोय अशी भावना निर्माण होणं ही सुद्धा आध्यात्मिक उन्नतीची खूण असू शकते.
 • तुम्ही स्वत:शी बोलू लागता, संवाद साधता. स्वत:शी संवाद साधण्याचं प्रमाण वाढणं हे सुद्धा आध्यात्मिक जागृतीचं लक्षण आहे.
 • आसपास माणसं असतानाही एकटेपणा जाणवणं हे लक्षण आध्यात्मिक उन्नतीकडे अंगुलीनिर्देश करतं.
 • सगळ्या इच्छा मरणं, काहीही करावंसं न वाटणं तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाऊ शकतं.
तुम्हाला घरी परतण्याची ओढ लागते. पृथ्वीवरचा आपला वास संपवून खर्‍या घराची म्हणजे स्वर्गाची ओढ लागू लागते.