आलियाने केले वरुण धवनचे कौतुक
   दिनांक :13-Apr-2019
मुंबई:
'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या तीन सिनेमानंतर 'कलंक' या सिनेमात दोघेही एकत्र दिसणार आहेत. या निमित्तानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं वरुण धवनची प्रशंसा केली आहे.

 
 
'कलंक'च्या सेटवरील काही गमतीजमती आलियानं यावेळी शेअर केल्या. 'वरुण सेटवर मला खूप चिडवायचा, छळायचा. कित्येकदा आदित्य रॉय-कपूरही त्याला साथ द्यायचा. असं असलं तरी 'कलंक'च्या शूटिंगचा अनुभव खूप चांगला होता. 'वरुण आता खूपच समंजस झाला आहे. या सिनेमात त्याचा एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळेल,' असंही तिनं सांगितलं.
अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक' सिनेमात वरुण, आलिया आणि आदित्य रॉय-कपूर यांच्यासोबतच अभिनेता संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि कुणाल खेमू हे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.