जयललिता यांच्यावर दुसरा बायोपिक
   दिनांक :13-Apr-2019
अभिनेत्री कंगाना रणौतचा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून त्यामध्ये तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरही बायोपिक ‘जया’ हा चित्रपट देखील असल्याचे म्हटले जात होते. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय करणार आहेत. पण आता जयललिता यांच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
 
 
एका वृत्तानुसार दिग्दर्शक केथीरेड्डी जगदीस्वरा रेड्डी देखील तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरही बायोपिक काढणार आहेत. तसेच या चित्रपटाचे नाव ‘शशिललिता’ असणार असल्याचेही म्हटले जाते. या चित्रपटात जयललिता यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री काजल देवगणची निवड करण्यात आली असून जयललिता यांच्या विश्वासू सहकारी शशिकला यांची भूमिका अमला पॉल साकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. काजोल आणि अमला यांच्या कडून या बाबात कोणत्याही प्रकारचा दुजोरा देण्यात आलेला नाही.
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर सहा बायोपिक काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच दिग्दर्शक प्रियदर्शिनी ‘आयर्न लेडी’ या नावाने बायोपिक काढणार आहे. या बायोपिकमध्ये नित्या मेनन जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. याव्यतिरिक्त राम गोपाल वर्मा आणि भारथीराजाने देखील जयललिता यांच्यावर बायोपिक काढण्याची घोषणा केली आहे.