ट्रॅफिक प्रदूषणाने भारतात साडे तीन लाख मुलं अस्थमाने ग्रस्त
   दिनांक :13-Apr-2019
- सर्वेक्षणातून झाले सिद्ध
 
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, प्रदुषण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे फक्त फुफ्फुसांवर आणि हृदयावरच परिणाम होत नाही तर अस्थमासारख्या अनेक आजारांचाही सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झालं की, ट्रॅफिकमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे भारतामध्ये साडेतीन लाखांहून अधिक मुलं अस्थमाने ग्रस्त आहेत. चीननंतर या आजाराचे सर्वाधिक रूग्ण असणारा दुसरा देश भारत आहे.
 
 
लांसेट प्लेनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, ट्रॅफिकमुळे होणारं प्रदुषणामुळे अस्थमाने ग्रस्त असलेल्या रूग्णांची सर्वाधिक संख्या चीनमध्ये दिसून आली. तिथे यामुळे 7 लाख 60 हजार पेक्षाही अधिक मुलांना अस्थमाचा सामना करावा लागत आहे. असं असण्यामागील दुसरं सर्वात मोठ कारण म्हणजे, चीनमध्ये लहान मुलांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. याव्यतिरिक्त नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) चे प्रमाण सर्वाधिक आहे. ट्रॅफिकमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळेच या ऑक्साइडचे प्रमाण वाढते.
अमेरिकेमध्ये असलेले जॉर्ज वॉशिंगटन यूनिवर्सिटीतील संशोधकांनी सांगितल्यानुसार, भारतामध्ये अस्थमाचा आजार होण्याची सर्वाधिक प्रकरणं आहेत कारण देशीतील एकूण लोकसंख्येमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. तेच अमेरिकेमध्ये अस्थमाने पीडित असणाऱ्या मुलांची संख्या 2 लाख 40 हजार, इंडोनेशियामध्ये 1 लाख 60 हजार आणि ब्राझीलमध्ये 1 लाख 40 हजार होती.
संशोधकांनी पुढे बोलताना सांगितले की, जर वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही ठोस पावलं उचलली तर अस्थमासारख्या आजारावर आळा घालणं सहज शक्य होतं. जागतिक स्तरावर सांगायचे झालेचं तर या संशोधनानुसार, प्रतिवर्षी एक लाख मुलांमध्ये अस्थमाची 170 नवीन प्रकरणं समोर आली आहेत आणि यांपैकी लहानमुलांना होणाऱ्या अस्थमाचे 13 टक्के प्रकरणं याच प्रदूषणाशी निगडीत आहेत.
दक्षिण कोरियामध्ये ट्रॅफिक प्रदूषणामुळे होणाऱ्या अस्थमाचे 31 टक्के प्रकरणं आहेत. या संशोधनामध्ये लांसेट जर्नलने 194 देशांमध्ये आणि जगभरामध्ये 125 प्रमुख शहरांचे विश्लेषण केलं आणि सांगितलं की, या लिस्टमध्ये संयुक्त राष्ट्र 24व्या स्थानावर, अमेरिका 24व्या स्थानावर, चीन 19 व्या स्थानावर आणि भारत 58व्या स्थानावर आहे.