आता हेल्मेटमध्येही घ्या एसीचा गारवा
   दिनांक :13-Apr-2019
बंगळुरू,
वाढत्या उन्हामुळे होणारी गरमी किती असह्य असते आपण सगळेच चांगले जाणतो. वाढत्या उन्हामुळे कित्येक बाईक चालवताना हेल्मट वापरण्याचे टाळतात. पण असे करणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण, बाजारपेठेत एक अनोखे डिव्हाईस आले आहे, जे लावल्यानंतर तुम्ही आवडीने हेल्मेट घालणार आहात. उन्हामुळे तुमच्या शरीरासोबत डोक्याची होणारी लाहीलाही या डिव्हाईसमुळे थंड राहणार आहे. फारच युनिक पद्धतीने हे डिव्हाईस काम करते. या डिव्हाईसमध्ये एक छोटासा एसी बसवला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
 
 
ब्ल्यूस्नॅप-2 असे या प्रॉडक्टचे नाव असून बंगळुरूच्या एका कंपनीने ते तयार केले आहे. हेल्मेटला हे डिव्हाईस अटॅच केल्यानंतर डोके तर थंड राहिलच सोबतच तुमचा प्रदूषणापासूनही बचाव होईल. कारण, यात एक एअर फिल्टर लावण्यात आला आहे. कंपनीने याआधी एक ब्ल्यूस्नॅप प्रॉडक्ट लॉन्च केले होते. त्यात काही बदल करून त्यांनी ब्ल्यूस्नॅप-2 हे प्रॉडक्ट आणले आहे.
 
एक छोटा पंखा या डिव्हाईसमध्ये लावण्यात आला आहे. ताजी हवा शोषून हा पंखा स्वच्छ आणि थंड करतो. त्यानंतर तो हवा हेल्मेटमध्ये दाखल होऊ देतो. म्हणजे कितीही तापमान वाढले तरी तुम्हाला थंड वाटणार. फोम आधारित फिल्टर या कूलरमध्ये लावण्यात आल्यामुळे कूलरचे पाणी जास्त वेळ चालते. 2,299 रुपये एवढी या कूलरची िंकमत आहे.
 
केवळ 10 सेकंदात गरम वातावरणात हा कूलर हेल्मेटला थंड करतो. त्याचबरोबर बॅटरीवर चालणारा हा कूलर तुम्हाला कारचे फििंलग देईल. म्हणजे धूळ-माती आत पोहोचणार नाही. तुम्ही यातील बॅटरी युएसबी केबलच्या मदतीने चार्ज करू शकता. एकदा चार्ज केल्यावर बॅटरी 10 तास चालते.