इंडोनेशियाला भूकंपाचा धक्का
   दिनांक :13-Apr-2019
जकार्ता,
इंडोनेशियाच्या पूर्व प्रांतांना आज शुक्रवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्क्लेवर या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती. भूकंपाच्या धक्क्यानंतर देशभर त्सुनामीचा इशारा देण्यात आला. परिणामी, भयभीत नागरिकांनी घरे सोडून ऊंच ठिकाणी आश्रय घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला. सुदैवाने कुठलीही प्राणहानी वा वित्तहानी झाली नाही. सुलावेसी बेटापासून 17 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा हा धक्का बसला. मागील वर्षी इंडोनेशियातील पालू शहरात त्सुनामीमुळे 4 हजार 300 लोक मृत्युमुखी पडले होते.