लोक मला अॅक्शनपटातच पाहू इच्छितात: प्रभास
   दिनांक :13-Apr-2019
मुंबई
'बाहुबली'नंतर तेलुगू सुपरस्टार प्रभास याचा 'साहो' हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित होणार आहे. 'साहो' हा एक हाणामारीनं भरलेला चित्रपट असून त्याबद्दल प्रभासला प्रचंड उत्सुकता आहे. सिनेरसिक मला अॅक्शनपटात पाहू इच्छितात, असं प्रभासचं म्हणणं आहे. 'साहो' हा त्याच पठडीतला असल्यानं त्यानं आनंद व्यक्त केला आहे.
 
 
प्रभासच्या 'बाहुबली' सिनेमानं बॉक्सऑफिसवर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले. प्रामुख्यानं दाक्षिणात्य चित्रपटात चमकणाऱ्या प्रभासला या चित्रपटामुळं संपूर्ण भारतात प्रसिद्धी मिळाली. मात्र, या चित्रपटानंतर हिंदीत त्याचा कुठलाही चित्रपट आला नव्हता. आता 'साहो'च्या माध्यमातून तो पुन्हा हिंदीत धडक देतोय. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही देखील यात दिसेल. 'साहो'मधील लुकसाठी प्रभासनं खूप मेहनत घेतली आहे. भूमिकेची गरज म्हणून त्यानं आहार आणि व्यायमातही बदल केला होता. चित्रपटाच्या कथेवर तब्बल तीन वर्षे मंथन सुरू होते, असं बोललं जातंय. त्यामुळंही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.