आघाडीतील सर्वच जण पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत- नरेंद्र मोदी
   दिनांक :13-Apr-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या प्रचारादरम्यान तामिळनाडूत आहेत. येथील एका सभेत त्यांनी काँग्रेसला पाठींबा देण्यावरुन द्रमुकवर निशाणा साधला. डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधीच्या नावाला पाठींबा दिला. मात्र, त्यांच्या या भुमिकेला आणि राहुल गांधींना महाआघाडीतील इतर पक्षांचा विरोध आहे. कारण, या आघाडीतील सर्वच जण पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
 
 
आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडच्या शताब्दीवर्षानिमित्त श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोर तामिळनाडूतील दिग्गज आणि दिवंगत नेते एमजीआर आणि जयललिता यांनाही श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी म्हटले की, देशाला अशा नेत्यांवर गर्व आहे. ज्यांनी गरीबांसाठी काम केले.
 
 
दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचे नाव न घेता टीका करताना मोदी म्हणाले, वडील अर्थमंत्री होतात आणि मुलगा देशाला लुटतो, आम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहोत.