नरेंद्र मोदींविरोधात त्यांच्यासारखाच दिसणारा उमेदवार रिंगणात
   दिनांक :13-Apr-2019
वाराणसी,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात अगदी त्यांच्यासारखाच दिसणार्‍या एका उमेदवाराचे आव्हान मिळणार आहे. अभिनंदन पाठक असे या हुबेहुब दिसणार्‍या उमेदवाराचे नाव आहे. अभिनंदन पाठक यांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिले नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आधी लखनौ मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता ते वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
 
 

 
लखनौमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अभिनंदन म्हणाले की, मी 26 तारखेला वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मी डमी उमेदवार नाही. मी कोणाविरोधात नाही. निवडणूक िंजकल्यानंतर मी राहुल गांधींना पाठिंबा देणार आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनंदन पाठक यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता.