पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीतून लढणार - प्रियांका वढेरांची भूमिका
   दिनांक :13-Apr-2019
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे, पण याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेत्या सोेनिया गांधी यांनाच घ्यायचा आहे, अशी भूमिका कॉंगे्रसच्या सरचिटणीस प्रियांका वढेरा यांनी आज शनिवारी विशद केली. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. मी आपली इच्छा राहुल गांधी यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यांनी अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही, असे त्या म्हणाल्या.
 

 
 
प्रियांका यांनी महासचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वाराणसीचा दौरा केला व काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. तेव्हापासूनच त्या निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना आम आदमी पार्टीचे संयोजक अरिंवद केजरीवाल यांनी वाराणसीत आव्हान दिले होते. या निवडणुकीत मोदी यांनी 3 लाख 71 हजार 784 मतांनी विजय मिळवला होता. केजरीवाल यांना 2 लाख 9 हजार 238, तर मोदींना 5 लाख 81 हजार 22 मते मिळाली होती.