रामनवमीच्या मिरवणुकांवर ममतांचा आक्षेप
   दिनांक :13-Apr-2019
- लोकांची दिशाभूल करण्यासाठी धर्माचा वापर
सिलिगुडी,
आज शनिवारी रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची मिरवणूक काढण्याची देशभरातच परंपरा असताना, िंहदुत्वद्वेषाने पेटलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्य भाजपा, विश्व िंहदू परिषद आणि अन्य िंहदू संघटनांनी काढलेल्या मिरवणुकांवर तीव्र आक्षेप घेतला. वििंहपच्या अनेक मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली. ऐन निवडणुकीत जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपा धर्माचा वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी करून टाकला. भाजपाने राज्याच्या विविध भागांमध्ये रामनवमीच्या सशस्त्र मिरवणुका काढल्या. यावरही आक्षेप घेताना, ममता बॅनर्जी यांनी, राज्यातील शांतता नष्ट करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
 

 
 
लोकसभा निवडणुकीत भाजपा धर्माचा अतिशयोक्ती वापर करीत आहे. जनतेची दिशाभूल करण्याच्या योजनेचा हा भागच आहे. अशा िंहसक संस्कृतीचे बंगालची जनता कधीच समर्थन करणार नाही. भाजपा आणि वििंहपचे लोक हातात तलवारी आणि धनुष्य घेऊन मिरवणुका काढत आहेत, यामुळे राज्यातील शांतता आणि सलोखा नष्ट होऊ शकतो, असा तर्कही त्यांनी काढला.
भाजपावाल्यांना या तलवारींनी कुणाचे मुंडके छाटायच आहे, हातात गदा घेऊन तुम्हाला कुणाचे डोके फोडायचे आहे, असा सवालही त्यांनी केला.