लोकसभा निवडणूक २०१९: महिन्याभरात तब्ब्ल चार कोटी ट्विट्स
   दिनांक :14-Apr-2019
दिल्ली:
 
लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीयच नाही तर सोशल मीडियावरचे वातावरण ही तापायला लागले आहे. गेल्या एका महिन्यांत ट्विटरवर भारतात ४ कोटी ५६ लाख ट्विट्स झाल्याचे समोर आले असून यातल्या बहुतांश ट्विट्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करण्यात आला आहे.
 
 
११ एप्रिलला लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. ११ एप्रिलपर्यंत ट्विटरवर किती मोठ्या प्रमाणात ट्विट करण्यात आले याची आकडेवारी ट्विटरने जाहीर केली आहे. प्रचारसभा,घोषणापत्र, धोरणं आणि विविध सामाजिक विषयांवर ट्विटरवर सर्वाधिक चर्चा होत असल्याची माहिती ट्विटरने दिली आहे. ११ एप्रिलला तब्ब्ल १२ लाख ट्विट करण्यात आले .
ट्विटरने केलं सर्वेक्षण
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्व्हेमध्ये ट्विटरचा वापर नक्की का केला जातो याचा शोध घेण्याचा ट्विटरने प्रयत्न केला आहे. ८० टक्के ट्विटर युजर्स जगात काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी ट्विटरचा वापर करत आहेत. तर १० टक्के युजर्स चर्चा करण्यासाठी ट्विटरचा वापर करत आहेत. ५४ टक्के युजर्स एखाद्या चळवीला,नेत्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने ट्विटर आणि इतर सोशल मीडियाचा वापर करत आहेत. तर ५४.४टक्के स्वत:चे मत व्यक्त करण्यासाठी करत आहे.