बॉक्स ऑफिसवर बदलाने गाठला इतक्या कोटींचा पल्ला
   दिनांक :14-Apr-2019
 
 
 

 
 
 
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेल्या बदला या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.   ८ मार्चला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपटाला आजही प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने आता १०० कोटींचा पल्ला पार केला आहे. शाहरूखच्या रेड चिली एंटरटेनमेंटने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्याही खूप अपेक्षा होत्या आणि आता या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देखील देत आहेत. चित्रपट सुपरहिट झाला असला तरी या चित्रपटाला मिळालेल्या यशाकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले असल्याची खंत अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली होती. या चित्रपटाच्या यशाची निर्माते, डिस्ट्रीब्यूट तसेच बॉलिवूड मधील कोणत्याही व्यक्तीने दखल घेतली नाही असे अमिताभ यांचे म्हणणे आहे. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत त्यांचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या ट्वीटवर या चित्रपटाचा निर्माता शाहरुख खानने लगेचच रिप्लाय दिला होता. त्याने ट्वीटमध्ये म्हटले होते की, सर, तुम्ही आम्हाला पार्टी कधी देत आहात याची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत. आम्ही रोज रात्री जलसाच्या बाहेर यासाठी उभे देखील असतो, असेही शाहरुख म्हणाला.