बीरेंद्रिंसह यांची राजीनाम्याची तयारी
   दिनांक :14-Apr-2019
नवी दिल्ली:
 
केंद्रीय पोलाद मंत्री आणि हरयाणातील भाजपाचे ज्येष्ठ नेते चौधरी बीरेंद्रिंसह यांनी आपण मंत्रिपद आणि राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्वतः बीरेंद्रिंसह यांनीच ही माहिती आज रविवारी दिली.
हरयाणातील हिस्सार मतदारसंघातून त्यांच्या मुलाला भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी येथील अधिकृत निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
 
 
 
मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपातही घराणेशाही असल्याचा संदेश जात असल्याने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना प्रस्तावित राजीनाम्याबाबत माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे सुरुवातीला ग्रामीण विकास मंत्रालय, तसेच पंचायत राज, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाची जबाबदारी होती. २०१६ मध्ये झालेल्या बदलामध्ये त्यांना पोलाद मंत्रालय देण्यात आले. तब्बल चार दशक काँग्रेसमध्ये घालवल्यावर त्यांनी २०१४ मध्ये भाजपात प्रवेश केला होता.