व्हेनेझुएलाच्या माजी गुप्तचर प्रमुखाला माद्रिद येथे अटक
   दिनांक :14-Apr-2019
माद्रिद,
व्हेनेझुएलाचे माजी गुप्तचर प्रमुख मेजर जनरल हुगो कारवाजल यांना आज स्पॅनिश पोलिसांनी अमेरिकेच्या वॉरंटच्या आधारे अटक केल्याचे वृत्त आहे. त्यांच्या अटकेमुळे व्हनेझुएला मधील राजकारणावरही पडसाद उमटणे अपेक्षित आहे. मेजर हुगो यांनी व्हनेझुएला या देशातल्या सरकारच्या विरोधात लष्करी अधिकाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. पण तेथील लष्कर हे बहुतांशी सरकारशी प्रामाणिक असल्याने त्यांच्या प्रयत्नांना कोणाचा प्रतिसाद मिळू शकला नाही असे सांगण्यात येते.
 
 
तथापी आज त्यांना आज मादकद्रव्याचा अमेरिकेत चोरट्या मार्गाने पुरवठा केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. सन 2006 साली त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून व्हेनेझुएला येथून मेक्‍सिकोच्या मार्गाने तब्बल 5 हजार 600 किलो इतक्‍या मोठ्या प्रमाणातील मादक द्रव्यांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.