IPL 2019 : कोलकाताची चेन्नईशी टक्कर
   दिनांक :14-Apr-2019
कोलकाता,
आयपीएलच्या बाराव्या सत्रात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज कोलकात्याच्या ईडन गार्डन सामना रंगणार आहे. घरच्या मैदानावर सलग दोन पराभव झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघावर दबाव राहणार आहे.
 

कोलकाता नाइट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्ज

वेळ : ४.०० वाजता 

स्थळ : इडन गार्डन, कोलकाता.
चेन्नई सुपर किंग्जने यंदा सात सामन्यात ६ विजय मिळवून १२ गुणांसह गुणतालिकेत प्रथम स्थान मिळविले आहे. एकमेव पराभव स्वीकारलेल्या तगडया चेन्नईचे कोलकाता संघासमोर आव्हान आहे. धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आणि कोलकात्याला सगळ्यात मोठा मॅचविनर ठरलेला आंद्रे रस्सेल या सामन्यासाठी पूर्णपणे फिट आहे. याशिवाय युवा खेळाडू शुभमान गिल चांगल्या फार्मात आहे. ईडन गार्डसवरील खेळपट्‌टी फिरकी गोलंदाजीला साथ देत नसल्याने केकेआरच्या फिरकीपटूंना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.
 
 
 तसेच वेगवान गोलंदाज प्रसिद कृष्ण आणि लोकी फर्ग्युसन यांनाही चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीने सलग तीन विजय मिळविलेले असल्याने संघाचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. पण गतसामन्यात महेंद्रसिंह धोनी वेगळयाच कारणामुळे प्रसिद्धीत आला.
 
'कॅप्टन कूल' म्हणून ओळखणारा धोनी पहिल्यांदाच पंचाच्या निर्णयाविरुद्ध मैदानात उतरताना दिसला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने पंच उल्हास गांधे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्‍त केली. यामुळे वादात सापडलेल्या धोनीवर सामन्याच्या मानधनावर ५० टक्‍के दंड आकारण्यात आला. पण माजी क्रिकेटपटूंनी धोनीची आलोचना केली. यानंतर आता पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन करत गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवण्याच्या उद्‌देशाने चेन्नई मैदानात उतरेल.