हॅमिल्टने जिंकली हजारावी फॉर्मुला-वन रेस
   दिनांक :14-Apr-2019
शांघाय,
लेविस हॅमिल्टनने आपली १०००वी फॉर्म्युला वन ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली आहे. येथे रविवारी झालेल्या चीनच्या ग्रांपी रेसमध्ये हॅमिल्टनने मर्सिडीजचा संघमित्र व्हेलटेरी बोट्टासला मागे टाकत हे विजेतेपद पटकावले.
  
 
हॅमिल्टन बोट्टासपेक्षा ६.५ सेकंदाने पुढे होता. फेरारीचा सेबास्तियन व्हेट्टेल तिसर्‍या स्थानी आला. रेड बुल्सचा मॅक्स व्हर्स्टापेन चौथा व दुसर्‍या फेरारीचा चालक चार्लिस लेक्लर्क पाचवा आला. विश्वविजेत्या हॅमिल्टनचा हा चीनच्या ग्रांपीमधील सहावा आणि या मोसमातील हा सलग दुसरा विजय ठरला. पहिले दोन क्रमांक मर्सिडीजला मिळाले, हेच माझ्या १००० व्या ग्रांपी विजेतेपदाचे वैशिष्ट्य आहे, परंतु सुरुवातीमुळेच हा फरक पडला, असे हॅमिल्टन म्हणाला. पात्रता फेरीतही हॅमिल्टनने बोट्टासपेक्षा ०.०२३ सेकंदाच्या फरकाने पोल पोझीशन प्राप्त केली. बोट्टास सध्या कारमुळे संघर्ष करत आहे, असेही तो म्हणाला.