बसंतीसाठी वीरूने घेतली प्रचाराच्या रणांगणात उडी
   दिनांक :14-Apr-2019
आग्रा:
रिअल लाईफमध्येही बसंतीच्या प्रचारासाठी वीरुने अर्थात अभिनेता धर्मेंद्रने प्रचाराच्या रणांगणात उडी घेतली आहे. मथुरामध्येहेमा मालिनीचा प्रचार करण्यासाठी धर्मेद्र यांनी प्रचार सभेला संबोधित केले.
 
 
 
रविवारी मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार हेमा मालिनी यांना मतदान करण्याचे आवाहन अभिनेता धर्मेंद्र यांनी केले. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. हेममालिनी या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. हेमा मालिनीचा विजय म्हणजे मथुरावासियांचा विजय आहे. शेतात घाम गाळणारा शेतकरी गरज भासल्यास देशाच्या रक्षणासाठीही सज्ज असतो. जाट समुदायाला मतदान करण्याचे आवाहन अभिनेता धर्मेंद्र यांच्याकडून करण्यात आले. तळपत्या उन्हात लोकांनी मोठ्या प्रमाणात धर्मेंद्रला बघण्यासाठी गर्दी केली होती. मोबाईलमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे छायाचित्र काढण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.
 
 
 
भाजपाच्या उमेदवार आणि अभिनेत्री हेमा मालिनी आपल्या मतदारसंघात अनोख्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. एकदा प्रचारादरम्यान हेमा मालिनी शेतात गव्हाचे पीक कापताना शेतमजूर महिलांसोबत दिसल्या. तर दुसरीकडे ट्रॅक्टर चालवताना दिसून आल्या. दरम्यान, यासंबंधीचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.