मुंबई ते शालिमार उन्हाळी विशेष गाडी
   दिनांक :14-Apr-2019
 नागपूर: उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असून, मुंबई-हावडा मार्गावर होणार्‍या अतिरिक्त वर्दळीला लक्षात घेता, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई ते शालिमारदरम्यान 11 फेर्‍यांकरिता उन्हाळी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 02041/02042 मुंबई-शालिमार-मुंबई समर स्पेशल गाडी मुंबईवरून प्रत्येक शनिवारी 20 एप्रिल ते 29 जून दरम्यान असेल तर गाडी शालिमार येथून सोमवार 22 एप्रिल ते 1 जुलैदरम्यान चालेल. या समर स्पेशल गाडीला 3 एसएलआर, 2 सामान्य, 7 स्लीपर, 2 तृतीय क्षेणी वातानकूलित, 1 द्वितीय वातानुकूलित डब्यासह 15 कोचेस राहणार आहे.
ही गाडी मुंबईवरून निघेल व दादर, कल्याण, इतगपुरी, नाशिक रोड, भुसावल, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडकपूर, सांतरागाछी, शालिमार येथे थांबे राहतील.