क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाच्या वडिलांचा व बहिणीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
   दिनांक :14-Apr-2019
अहमदाबाद,
क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाने भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्याची बहिण नयनाबा जाडेजा व वडिल अनिरुद्ध सिंह जाडेजा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाच्या वेळी पाटीदार नेते हार्दीक पटेल, काँग्रेस आमदार विक्रम माडम उपस्थित होते.

 
रविंद्र जाडेजाच्या यशात त्याची बहिण नयनाबाचा मोठा हात आहे. रविंद्रच्या आईचे निधन झाल्यानंतर नयनाबाने संपूर्ण कुटुंबाला सांभाळले आहे. जाडेजाची बायको रिवाबा जाडेजाने मार्च महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रिवाबाला भाजपाकडून लोकसभेचे तिकीट देण्यात येणार असल्याचे देखील बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी जामनगरमध्ये काँग्रेसचे उमेदवार मुलु कांदोरिया यांच्या प्रचारासाठी जाडेजाचे वडिल व बहिण देखील गेले होते. त्यामुळे आता जर भाजपाने जामनगरमधून रिवाबाला तिकीट दिले तर रिवाबाच्या उमेदवारीला सर्वप्रथम घरातूनच विरोध होईल असे बोलले जात आहे.