लग्नाचे आमिष दाखवून ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कारच ; सर्वोच्च न्यायालय
   दिनांक :14-Apr-2019
 
 
पुणे: लग्नाचे आमिष दाखवत ठेवलेले शरीरसंबंध हे बलात्काराच्या श्रेणीत येत असल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. लग्नाचे आमिष दाखवत स्त्रीला फसवून तिची संमती घेत तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्यास तो त्या स्त्रीचा विश्वासघात व फसवणूक आहे. यानुसार लग्नाचे खोटे आश्वासन देऊन ठेवलेल्या शरीरसंबंधातील आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. एका खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाची नुकतीच पुनरुक्ती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या ताज्या निकालावरुन निर्णयावरुन मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत.
 

 
 
तज्ञांच्या मते बलात्काराची प्रकरणे वाढत असल्याने हा स्त्रीयांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने भारतीय दंड संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यात दुरुस्ती करुन त्या स्त्रीची संमती तिची फसवणूक करुन मिळवली असेल तर अशा शाररीक संबंधाला बलात्कार म्हणता येईल. पण येथे फसवणूक हा शब्द आहे. म्हणजेज ही वस्तुस्थिती आरोपीनी दाखविलेली खोटी होती. सत्य त्या स्त्रीला माहिती नव्हते. असे असेल तर त्यास फसवणूक म्हणता येईल. भारतीय संस्कृतीमध्ये नुसत्या लग्नाचे आश्वासनच नव्हे तर साखरपुडा झाला असला तरी शरीरसंबंध ठेवण्याची नैतिक परवानगी नाही. परंतु त्या दोघांच्या संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरणार नाही.