मुर्तिजापूरजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात
   दिनांक :14-Apr-2019
 
 
मूर्तिजापूर :  मुर्तीजापूर तालुक्यातील अनभोरा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक विरुद्ध दिशेने येत असलेल्या कार वर कोसळला. रविवारी दुपारीझालेल्या या अपघातात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. एका परिवारातील दोन कार ओव्हरटेक करीत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 

 
 
रविवारी दुपारी १:३० वाजताचे दरम्यान ट्रक क्रमांक एम एच ०४ जे के ८६६२ अकोल्याकडे जात असताना एकाच परिवारातील दोन कार नागपूरच्या दिशेने जात होत्या. दोन्ही कार एकमेकांना ओव्हरटेक करीत असताना समोर निघुन जाणाऱ्या कारचा धक्का ट्रकला लाकल्याने ट्रक चालकाचे वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक मागच्या एम एच ४० ए आर ४०९० क्रमांकाच्या कारवर जाऊन कोसळला. या मध्ये कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. सुदैवाने कारमधील चार प्रवाशी थोडक्यात बचावले. त्यात दोन बालकांचा समावेश होता. एक व्यक्ति किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तिला मूर्तिजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.