राजसाहेब, माझ्याही मतदारसंघात या ना!
   दिनांक :14-Apr-2019
 
 मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल, अशी इच्छा कॉंग्रेसच्या लोकसभा निवणुकीच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
 
 
 
सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून कोणताही उमेदवार उभा नाही. मात्र, राज ठाकरे यांनी राज्यात सभांचा धडाका सुरू केला आहे. मागील निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पािंठबा दर्शविणारे राज ठाकरे यांनी यावेळी मात्र, मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहेत. याचा फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार असल्याचे बोलले जात आहे. हीच बाब हेरत कॉंग्रेसकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून ऊर्मिला मातोंडकर यांनी राज ठाकरे यांच्या सभेची इच्छा व्यक्त केली आहे.
 
मुंबई उत्तर मतदार संघात उर्मिला आणि भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यात लढत होत आहे. २०१४ च्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी गेल्या निवडणुकीत संजय निरुपम यांचा पराभव केला होता. याआधी याच ठिकाणी अभिनेता गोिंवदा आहुजाने भाजपाचे राम नाईक यांचा पराभव केला होता. यामुळे सेलिब्रेटीसाठी हा मतदार संघ अनुकू ल असल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होत असून, सर्व बाबी २३ मे रोजीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.