घाऊक महागाईच्या दरात किंचित वाढ
   दिनांक :15-Apr-2019
नवी दिल्ली,
घाऊक महागाईच्या निर्देशांकात गेल्या मार्च महिन्यात किंचित वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात असलेला 2.93 हा दर मार्चमध्ये 3.18 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 

 
 
मार्च 2018 मध्ये तो 2.74 टक्के इतका होता. गेल्या महिन्यात इंधन आणि काही खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम महागाईच्या दरात वाढ होण्यावर झाला असल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मार्च महिन्यात भाजीपाल्याचे दर 28.13 टक्क्यांवर होते. त्यापूर्वीच्या महिन्यात हाच दर 23.40 टक्के इतका होता. त्याचप्रमाणे इंधनाचा फेबु्रवारीत असलेला 2.23 टक्के हा दर मार्चमध्ये 5.41 टक्क्यांवर गेला.