शुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला
   दिनांक :15-Apr-2019
 
 
 
 पिंपळगाव येथिल घटना
 जख्मीवर‌ सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू
 
गिरड: परीसरातिल पिंपळगाव येथे दोघांमध्ये शुल्लक  कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने एकाने दुसऱ्यावर मासे कंपन्यांच्या सत्तुरने वार करून जख्मी केल्याची घटना १४ एफ्रिलला रविवारला रात्री ९ वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार पिंपळगाव येथिल नथ्थु सुर्यभान तेलंगे वय ४५ व अवीन किसानाजी भोयर वय २६ या दोद्यान मध्ये सायंकाळी शुल्लक कारणावरून वाद झाला.

 
 
हा वाद इतक्या विकोपाला गेला की, नथ्थु सुर्यभान तेलंगे हा रात्री बौद्ध विहारात जेवन करीत असतांना अवीन भोयर ने त्याच्या मागून येऊन लाधा बुक्यानी मारहाण करीत सोबत आनलेल्या मच्छी तोडण्याच्या सत्तुरने त्याने नथ्थु सुर्यभान तेलंगे वर सपासप तिन वार करीत गंभीर जखमी केले.आगलीच गावातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी समुद्रपुर ग्रामिण रुग्णालयात दाखल केले येथे प्राथमिक उपचार करुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच गिरड पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपि अवि भोयर याचे विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी भिमराव टेळे यांनी पिंपळगावला भेटे देउन झालेल्या घटने‌ संबधी विचारपुस केली. जख्मीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार महैंद्र ठाकुर याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक दिपक निंबाळकर ,रामदास दराडे,सागर पाचोडे,आदी सह पोलीस कर्मचाऱ्यांरी करीत आहे.