प्रेमीयुगलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
   दिनांक :15-Apr-2019
 
 
 
वाशीम : येथिल महाराणा प्रताप चौकामधील एका आखाड्यामधे वाशीम येथील  प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
येथिल महाराणा प्रताप चौकामध्ये राहणार युवक आशिष उमेश दिक्षीत (वय 28) व कान्होपात्रा माधव राऊत (वय 22) या दोघांचे एकमेंकावर प्रेम होते. दोघांनीही सोमवारी पहाटे नजीकच्या आखाड्यामधील आडव्या लोखंडी पोलला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी युवतीने गळ्यामध्ये मंगळसुत्र, पायामधे जोडवे व भांगेमधे कुंकू भरलेले आढळून आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहली. त्यामधे आम्ही एकमेंकावर प्रेम करत असून, आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये असा उल्लेख होता. या घटनेचा तपास पोलिस उपनिरिक्षक अश्‍विनी धोंडगे, सहा. पोलिस उपनिरिक्षक भास्करर देशमुख, जमादार सिध्दार्थ राऊत, पोलिस शिपाई भगवान मुकाडे करीत आहेत.